पुणे – व्यवसायासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून लहान भावाने राहत्या घरातच थोरल्या भावावर चाकूने (Crime) वार करून त्याचा खून (murder news) केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला असून, या घटने मुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) आरोपी मंथन अरुण धुळप (२३) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, कल्पेश अरुण धुळप ( २६, रा.तावरे पेट्रोल पंपामागे, अमरसिंह कॉलनी, बु ता. बारामती जि.पुणे), असे खून (murder news) झालेल्या थोरल्या भावाचे नाव आहे.

लहान भावाने माेठ्या भावाच्या मानेवर व छातीवर अनेक वार करून खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजता घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मोठा भाऊ कल्पेश याला आठ दिवसांपूर्वी लहान भाऊ मंथन याने चप्पलच्या व्यवसायाकरिता १ लाख ४० हजार रुपये भांडवल दिले होते.

त्यानंतर आठ दिवसांनंतर दिलेल्या भांडवलाचे काय केले असे मंथनने मोठा भाऊ कल्पेशला विचारले. यावर कल्पेशने हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे सांगितल्याने दोघांत हाणामारी झाली.

यावेळी मंथनने मोठा भाऊ कल्पेशवर चाकूचे वार करून ठार (murder news) केले. याप्रकरणी आई सुरेखा अरुण धुळप यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारीचे वातावरण मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होत असून गेल्या आठवड्याभरापासून पुणे जिल्हा परिसरात अनेक ठिकाणी खून केल्याच्या घटना घडल्या आहेत.

“आमच्याकडचे गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो?’, म्हणत डोक्यात कोयत्याने केले वार

नुकतंच, पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर परिसरात आमचेकडे आलेले गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो असे म्हणत दोन मासे विक्री करणाऱ्यामध्ये वाद झाला. यानंतर मासे कापण्याच्या सुऱ्याने एकाच्या डोक्यात गंभीर वार (Crime News) करत जखमी केलं आहे.

सोयल रफिक मोमीन (रा. मोमीन आळी राजगुरूनगर ता. खेड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून आमन मोमीन व सुफियान मोमीन उर्फ दुध्या रा. राजगुरूनगर (ता.खेड ) यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.