पुणे – पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime Rate) प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात (Crime Rate) अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात. नुकतंच शहरातील नाना पेठ (Nana Peth) परिसरात एक मोठी घटना घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. नाना पेठेत (Nana Peth) मंगळवारी मध्यरात्री एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून (Crime) करण्यात आलाय.

एका महिलेसह सहा जणांनी मिळून मध्यरात्री त्याच्यावर खुनी हल्ला चढवला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नाना पेठेतील राजेवाडी परिसरात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन रवींद्र पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन पवार हा सर्व गुन्हेगार (Crime) असल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी रोहन पवार यांच्या घराजवळ राहणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत उर्फ मट्या कुचेकर, तेजस जावळे, राजन उर्फ रोहित काउंटर, अतिश उर्फ प्रकाश फाळके, आदित्य केंजळे आणि उषा कुचेकर अशी आरोपींची नावे आहेत. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्यात पूर्वीपासूनच वाद होते. याच वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंगळवारी मध्यरात्री रोहन हा घरात असताना आरोपी मट्या यांनी त्याला घराबाहेर बोलावले आणि कोयत्याने वार केले. इतर आरोपींनीही त्याच्यावर चाकूने आणि दगड विटांनी वार करत तिला ठार मारले.

या भीषण हल्ल्यात रोहन पवार याचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

सध्या अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. यावर प्रतिबंध आणण्यासाठी पोलिसांनी विशेष अभियान चालविले पाहिजे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.