file photo

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

घरातील एका ओल्या चड्डीवरून संशय आल्याने गुन्ह्याची उकल झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि साखरे वस्ती, हिंजवडी येथे रविवारी (दि. ३) दुपारी चार ते सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान खुनाचा प्रकार घडला होता.

Advertisement

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

कैलास अंकुश डोंगरे (वय २३, रा. साखरेवस्ती, हिंजवडी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

संतोष विश्वनाथ माने (वय ३८, रा. साखरेवस्ती, हिंजवडी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Advertisement

याप्रकरणी सरस्वती संतोष माने (वय ३५) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मानेचा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार करून खून केला.

याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Advertisement

त्यानंतर पोलिसांनी परिसरात नवीन कोणी आले आहे का, अशा बाबींचा तपास सुरू केला.

शेजारी राहणाऱ्या लोकांनी देखील त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

खुनातील आरोपीचा काहीच सुगावा लागत नव्हता.  दरम्यान, पोलिसांनी शेजारील घरात पाहणी केली.

Advertisement

त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे यांच्या नजरेमध्ये शेजारच्या घरात ओली चड्डी (अंडवेअर) दिसली. घरातील सर्व कपडे सुकलेले आहेत.

पंरतु फक्त एक चड्डी ओली का, असा प्रश्न मारणे यांनी केला.

मी अंघोळ केली आहे, असे कैलास डोंगरे याने सांगितले.

Advertisement

एवढया रात्री त्याने आंघोळ का केली, असा प्रश्न मारणे यांच्या मनात उपस्थित झाला.

मी चड्डीत ओकल्यामुळे आंघोळ केली, असे कैलासने सांगितले.

त्यामुळे संशय बळावला. चड्डीत कसे ओकू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला.

Advertisement

त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता कैलासने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.