पुणे – ‘पुणे तिथे काय उणे’ पुणेकरांच्या (Punekar) या म्हणीप्रमाणे काम करत असतात यामुळे पुणेकरांच्या कामाची जोरदार चर्चा होत असते. पुण्यात कोणत्यावेळी काही घडेल याचा नेमका अंदाज कोणालाही येत नाही. पुण्यात मागच्या काही काळापासून गुन्हेगारीच्या (Crime) प्रमाणात वाढ होत आहे. सध्या पुण्यात सेक्सटोर्शनच्या प्रकारांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. पुणे शहर (pune) हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते परंतु या घटनेला काळीमा फासणारी घटना नुकतीच घडली आहे.

पुणे (pune) शहरातील एका गोडाऊन मधून तब्बल दहा लाख रूपयांचे ‘सेक्स टॉईज’ (sex toys) जप्त करण्यात आले आहेत. पुण्यातील लष्कर पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली असून एका गोडाऊनमधून तब्बल दहा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका व्यक्तीवर कलम 292,293 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू होती अशी प्राथमिक माहिती आहे.

याप्रकरणी तपास सुरू असून सेक्स टॉईज (sex toys) सापडलेल्या गोडाऊनमध्ये असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काही अल्पवयीन मुलांना हे सेक्स टॉय विकल्या जात होत्या का याचा तपास पोलिस करत आहेत.

संकेतस्थळावरून सेक्सटॉईजची विक्री होत असल्याची माहिती लष्कर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पुण्यातील पुलगेट चौकीच्या बाजुला असलेल्या भाजी बाजारच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला.

यावेळी गोडाऊनमध्ये अनेक सेक्स टॉय होते. याची किंमत जवळपास दहा लाख रूपयांच्या आसपास होती. पोलिसांनी गोदामातील एका व्यक्तीला ताब्यात घेत हा सर्व मुद्धेमाल जप्त केला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्यात 2022 या एका वर्षात सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकलेल्यांची संख्या तब्बल 1,400 हून अधिक असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी सेक्सटॉर्शनमुळे पुण्यात दोघांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर सेक्सटॉर्शनबाबत चर्चा वाढू लागली.