पुण्यातुन एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे चिंचवड येथे पत्नीवर संशय घेत पतीने बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एक नातेवाईक पत्नीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे उघड झाले. चिंचवड येथे २ जुलै २०१८ ते ३० ऑगस्ट २०२१ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी २८ वर्षीय पीडित महिलेने रविवारी (दि. ३) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पीडित विवाहितेचा पती, सासरा, नणंदेचा पती आणि दोन महिला यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅट घेण्यासाठी सासरच्या लोकांनी फिर्यादीकडे २५ लाख रुपयांची मागणी केली.

Advertisement

फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादीच्या पतीने फिर्यादीच्या बेडरुममध्ये कॅमेरे लावले. तर फिर्यादीच्या नणंदेच्या पतीने फिर्यादीसोबत बळजबरी करून लैंगिक अत्याचार केले. तसेच नणंदेचा पती व फिर्यादीचा पती यांनी बळजबरीने फिर्यादीचा गर्भपात केला.

याप्रकरणी पीडित फिर्यादी महिलेले पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फिर्यादीच्या नणंदेचा पती व फिर्यादीच्या पतीला पोलिसांनी अटक केली.

Advertisement