पुणे – पुणे पोलिसांसाठी (Pune Police) नेहमीच डोके दुखी ठरत असलेल्या गज्या मारणेला ( Gajya Marne ) पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. त्याच्या टोळीतील एका गुंडाला अटक करण्यात पुणे पोलीसांना यश आले आहे. शेयर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दिलेल्या चार कोटींच्या बदल्यात वीस कोटींची मागणी करत पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला धमकी (Pune Crime News) दिली होती.

त्या प्रकरणात गज्या मारणेसह त्याच्या टोळीवर थेट मोक्काची कारवाई करण्यात आली होती. त्यातीलच काही आरोपी फरार होते, पुणे पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते.

त्यातील एका मोठ्या गुंडाला पुणे पोलीसांनी सापळा रचत नवले ब्रीज येथून अटक केली आहे. मयूर राजेंद्र निवंगुणे असे 24 वर्षीय गुंडाचे नाव आहे. तो नर्हे येथील वसंत प्लाझामध्ये राहणारा आहेत.

शेअर दलालाचे 20 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोथरुडमधील गुंड गज्या मारणे (Gangster Gajanan Marne) काही दिवसांपूर्वीच पसार झाला होता. मात्र, त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेकडून पथके तयार करण्यात आली होती.

तसेच, गुंड गज्या मारणे याला आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी दिला होता.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी गज्या मारणे याच्यासह 14 जणांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे आदेश मंगळवारी रात्री दिले होते.

त्यानुसार गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील, अमर शिवाजी किर्दत, फिरोज महमंद शेख, रुपेश कृष्णराव मारणे, संतोष शेलार, मोनिका अशोक पवार, अजय गोळे, नितीन पगारे, प्रसाद खंडागळे,

नवघणे यांच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई सुरु करण्यात आली आहे. पुणे शहरात दहशत निर्माण करत कुख्यात गुंड झालेल्या गज्या मारणेला आणि त्याच्या टोळीला पुणे पोलीसांनी चांगलेच रडारवर घेतले आहे.