हडपसर – पुणे (pune) शहरातील हडपसर (hadapsar) परिसरात पोलिसांनी (police) एक मोठी कारवाई केली आहे. हडपसर परिसरात रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार व त्याच्या साथीदारांना गांजा व चरस हे अमली पदार्थ विक्री करताना पोलिसांनी (police) अटक केली. यावेळी पोलिसांनी तब्बल साडेपाच लाखांचा गांजा आणि चरस (charas – ganja) मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे हडपसर (hadapsar) परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हडपसर पोलिस ठाणे, कडील पोलिस निरीक्षक विश्वास डगळे, तपासपथकातील अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे व

अंमलदार असे हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, लॉरेन्स राजू पिल्ले (४२, रा. मांजरी, पुणे), त्याचे आणखी दोन साथीदार ऋषिकेश जगदीश भोजने (३२), मंगेश सुनील पवार (३२, दोघे रा. हडपसर, पुणे) हे

१ किलो ४४८ ग्रॅम गांजा ओला सुका बोंडे व फुले असलेला व १२० ग्रॅम चरस वजनाचे घट्ट पातळ द्रव्य काळया रंगाचे गोळे हे प्लॅस्टीक पिशव्यामध्ये पॅकिंग करीत असताना मिळून आले आहे. आणि याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

यावेळी त्यांच्याकडून १ किलो ४४८ ग्रॅम गांजा आणि १२० ग्रॅम चरस, मोबाइल हँडसेट, वजन काटा, होंडा अॅक्टिव्हा मोपेड असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आरोपींवर हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं १२४५ / २०२२, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (ब), २९ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोलिस उप निरीक्षक अविनाश शिंदे हे करीत आहेत.

दरम्यान, सध्या पुणे शहर आणि परिसरात देखील अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अश्यावेळी पोलिंसानी देखील कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.