पुणे – पुणे शहर आणि परिसरात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime Rate) प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात (Crime Rate) अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात. नुकतंच शहरात आणखी एक गुन्हा घडला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. तसेच सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणाला भर रस्त्यात पडून उलट्या कोयत्याने मारहाण केली. इतकेच नाही तर ‘आम्ही येथील भाई आहोत थांब तुला दाखवतो’, असं म्हणून ठार (Crime) मारण्याचा प्रयत्न केला.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Police) हद्दीतील तळवडे चौकात हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल पवार कुणाल शितोळे विशाल शितोळे आणि आकाश राखपसरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सर्व आरोपी उरळीकांचन (Uruli Kanchan) परिसरात राहणारे आहेत. तर मारुती विभीषण गवळी (वय 28) यांनी याप्रकरणी तक्रार (Crime) दिली आहे. 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला असून, परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीच्या आहेत, 19 तारखेच्या रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी मित्रांना सोडण्यासाठी चार चाकी वाहनाने आले होते. आरोपींनी त्यांची गाडी भरस्त्यात अडवून पूर्वीच्या कारणावरून वाद घातला.

उरुळी कांचन परिसरात पुन्हा दिसायचे नाही असे चांगल्या पद्धतीने सांगितले होते, त्यावेळचा मार कमी पडला का असे म्हणून लोखंडी कोयत्याने ठार मारण्याचा उद्देशाने मारहाण केली.

“आम्ही येथील भाई आहोत थांब तुला दाखवतो परत इकडे फिरकायच नाही’, असे म्हणून कोयता हवेत फिरवून दहशत माजवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांच्या (Police) या कारवाईमुळे हातात तलवार घेऊन केक कापणे, दहशत पसरविणे आणि समाज माध्यमांवर स्टोरी अपलोड करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस असे अनेक तलवार भाई तयार होत असून, भर चौकात धिंगाणा घालत आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे सामान्य नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे.