पुणे – पुणे शहरात एक धक्कादायक (Pune Crime News) प्रकार घडला असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मुलावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे (girlfriends) फोटो आणि व्हिडीओ एका वेबसाईटवर पोस्ट केल्याप्रकरणी (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे. मार्च ते सप्टेंबर 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी आता लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमेय अनिल दबडे (Amey Dabade) असे या तरुणाचे नाव आहे. अमेय हा कोंढवा ब्रुद्रुक परिसरात राहायला आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Case Filed) केली होती. या तक्रारीवरून अमेयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, धक्कदायक बाब म्हणजे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी अमेय अनिल दबडे (Amey Dabade) हा सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांचा मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि अमेय एकाच महाविद्यालयात शिकत होते. काही वर्ष दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांमध्ये वाद झाल्याने तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले.

त्यानंतर अमेयने तरुणीला पुन्हा त्याच्यासोबत येण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र मुलीने नकार दिला. त्यानंतर त्याने मुलीचे छायाचित्र आणि ऑडिओ रेकॉर्ड सोशल मीडिया आणि वेबसाईटवर फिरवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

तरुणीने त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. काही वेळानंतर मुलीला समजले की तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तिने पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमेयच्या पालकांनी मुलीची माफी मागितली आणि आपापसात हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला.

यानंतर फेक अकाऊंटचा वापर करून तरुणीचा फोटो अश्लील वेबसाईटसह सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यानंतर मुलीने त्याला विचारले पण अमेयने काहीही केले नसल्याचे सांगत नकार दिला.

त्यानंतर तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर अमेयनेच तरुणीचे फोटो अपलोड केल्याच उघड झालं. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.

दरम्यान, आरोपी अमेय याला तरुणीच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड माहित होता. याचाच वापर करून त्याने न्यूड फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर अपलोड केले. तसेच तिच्या नावाने बनावट पॉर्न वेबसाईट सुरू केली आणि त्याच्यावर देखील फोटो व्हिडिओ अपलोड केले.