पुणे – पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime Rate) प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात (Crime Rate) अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात. नुकतंच शहरातील हडपसर (hadapsar) परिसरात एक मोठी घटना घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. शेजारी राहणाऱ्या एका नागरिकाला तरुणाने गुप्तांगावर वार करून ठार (murder) मारले आहे.

हडपसर (hadapsar) पोलीस (Police) ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण किसन सूर्यवंशी (वय 54, रा. मोरे नर्सरी शेवाळवाडी, मांजरी बुद्रुक पुणे, मूळ कर्नाटक) असे खून (murder) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी पिताराम केवट (वय 23) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीचा मुलगा लक्ष्मण अरुण सूर्यवंशी (वय 25) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहतात. 15 नोव्हेंबर रोजी आरोपी अरुण सूर्यवंशी यांना बाहेर घेऊन गेला. अज्ञात कारणावरून त्याने त्यांच्या गुप्तांगाला इजा करून त्याला ठार मारले.

त्यानंतर तो त्या दिवशी एकटाच घरी परत आला आणि घरातील सर्व साहित्य आणि पत्नीला घेऊन निघून गेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, हडपसर भागात हा दुसरा खून झाला असून या घटनेमुळे सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या शहरात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलं आहे.

सध्या अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. यावर प्रतिबंध आणण्यासाठी पोलिसांनी विशेष अभियान चालविले पाहिजे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.