पुणे – पुणे शहरात (Pune news) नुकताच एक धक्कदायक (Crime) प्रकार घडला असून, या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. शहरातील औंध परिसरात भर दिवसा प्रेम प्रकरणातून एका तरुणीचा तीक्ष्ण शस्त्राने वार (Crime) करून खून (murder) करण्यात आला. बुधवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्वेता रानवडे (वय 22, रा. औन्ध) असे खून (murder) झालेल्या तरुणीचे नाव आहे.

दरम्यान, या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस (chatushringi police) ठाण्यात प्रतीक ढमाले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही ओळखीचे असून त्यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

दोघांचे कुटुंब देखील एकमेकांचे नातेवाइक आहेत. दोन्ही कुटुंबाने त्यांचा विवाह देखील ठरवला होता. पण काही काळानंतर श्वेताला प्रतिकची वागणूक चांगली नाही, हे जाणवले. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे कमी केले.

कालांतराने लग्नाला व प्रेमाला देखील नकार दिला. कुटुंबानेही हे लग्न मोडले होते. दरम्यान यानंतरही प्रतीक तिचा पाठलाग करत होता. लग्नासाठी तिला गळ घालत होता. मात्र ती त्याला जुमानत नव्हती. त्याचा राग प्रतीक याच्या मनात होता.

आणि अखेर काल म्हणजेच, बुधवारी दुपारी प्रतीक श्वेताच्या घरी आला. प्रतिकने तिला खाली बोलावले. दोघे सोसायटीच्या पार्किंगमध्ये बोलत असताना त्यांच्यात वाद निर्माण झाला.

यावेळी प्रतिकने चाकूने तिच्या गळ्यावर सपासप वार केले. श्वेता रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो पसार झाला. नागिरकांनी पोलिसांना माहिती देत श्वेताला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

पण, तिचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. मात्र, पसार झालेल्या प्रतीकचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.