पुणे – बुलेट (bullet bike) गाडीला मॉडीफाय केलेले सायलेन्सर (silencer) लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वार आपण अनेकदा पाहतो. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सरमुळे (silencer) मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते, शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही सहन करावा लागतो.

बुलेटवरून (bullet bike) हवा करत फिरणारे तरुण आपल्या गाडीला बरेच महागडे सायलेन्सर लावतात, बाजारात देखील यांची किंमत हजारांच्या घरात आहे. मात्र, हेच महागडे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मोटारींचे सायलेन्सर (silencer) चोरणाऱ्या टोळीला पुणे (Pune Police) गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 20 हजारांचे 16 सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यांनी हडपसर, शेवाळवाडी, फुरसुंगी, देवाची ऊरुळी, मुंढवा, मांजरी येथील सायलेन्सर चोरी केले.

पोलिसांच्या (Pune Police) माहितीनुसार, सायलेन्सरमधील मौल्यवान प्लॅटिनम धातूमिश्रित माती काढून ती परराज्यातील आरोपींना विक्री केल्याचे निष्पन्न झाले. आरिफ सलीम शेख (19 रा. हडपसर), हुसेन बढेसाहब शेख (23),

साहिल वसीम शेख (19 रा. वैदवाडी, हडपसर), सहजाद अक्रम खान (19 रा. वैदवाडी, हडपसर), रहीम खलील शेख (24, रा. रामटेकडी), सोहेल सलीम खान (23, महंमदवाडी रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बुलेट किंवा इतर महागड्या स्पोर्ट बाईकला अश्या प्रकारचे सायलेन्सर लावण्यात येतात.

बुलेटमधून फटाकड्या फोडणाऱ्या बुलेट राजांविरोधात पोलिसांची कारवाई :

बुलेटचा फाडफाड आवाज काढून फिरणाऱ्या बुलेट चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काहीदिवसांपूर्वी कारवाई होती. ध्वनी प्रदूषण (Sound Pollution) होत असल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे शहर आणि इतर परिसरात गेल्या सहा महिन्यात बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करत 22 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.