पुणे – भाईगिरी करताना परिसरात आपली दहशत निर्माण करणाऱ्या ओक्के भाई उर्फ ओंमकार चंद्रशेखर कापरे (वय 27, रा. कोंढवा खुर्द) व मनिष उर्फ आकाश मारूती झांबरे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Arrested) आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार असणाऱ्या या दोघांना वानवडी पोलिसांच्या (Police) पथकाने सापळा रचून अटक (Arrested) केली. ओक्के भाईकडून पोलिसांनी एक पिस्तूल व पाच जिवंत काडतूसे जप्त (crime) केली आहेत. ते पिस्तूल कशासाठी बाळगून फिरत होते, याची चौकशी पोलीस अधिकारी करत आहेत.

शहरातील गुन्ह्यांना पायबंद घालण्यासोबतच सराईतांची (Vanwadi) माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. यादरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक जयवंत जाधव व पथक हद्दीत गस्त घालत होते.

यावेळी सराईत गुन्हेगार ओकेभाई पिस्तूल घेऊन फिरत असून, तो काळेपडळ येथील जीएसपीएम कॉलेज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार पथकाने लागलीच यिथे धाव घेऊन सापळा रचला. आणि त्यांना ओकेभाई व त्याचे साथीदार येत असताना दिसून आले. त्यांनी दोघांना पकडले.

चौकशी केली असता ओकेभाईने कंबरेला लावलेले पिस्तुल मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, त्यांनी हे पिस्तूल कोणाकडून व कशासाठी आणले याबाबत चौकशी केली जात आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सध्या पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात भाईगिरीचे वातावरण वाढले असून अनेक तरुण याला बळी पडल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच हातात तलवारी घेऊन नाचवणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

हातात तलवारी घेऊन (sword ) परिसरात आरडा-ओरड करत दहशत पसरविणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी (Chinchwad crime) बेड्या ठोकल्या (Arrested) आहे. हा प्रकार बुधवारी रात्री साडे नऊ वाजता चिंचवड येथील लिंकरोड परिसरात घडला.

हे तरुण हातात तलवारी घेऊन परिसरात आरडा-ओरड करत फिरत होते. “आम्ही इथले भाई आहोत. आम्हाला कोणी नडला त्याला कापून काढू’ असे बोलून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली होती. याची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांनाही अटक केली आहे.

सध्या अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. यावर प्रतिबंध आणण्यासाठी पोलिसांनी विशेष अभियान चालविले पाहिजे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.

पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस असे अनेक तलवार भाई तयार होत असून, भर चौकात धिंगाणा घालत आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे सामान्य नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे.