पुणे : शहरात दिवसेंदिवस विनयभंगाच्या (Molestation) आणि अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात अशीच एक घटना घडली आहे. फोटो व्हायरल (Photo viral) करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार(Rape) करण्यात आला आहे.

सदर तरुणीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेऊन तरुणीचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पुन्हा बलात्कार (Rape) करण्यात आला.

पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि. 15 डिसेंबर) ही घटना घडली आहे. प्रथमेश उर्फ ​​सनी खैरे, स्वराज कदम (दोघेही रा. पिंपळे गुरव) प्रथमेश याचा अनोखा मित्र यांच्याविरोधात पोलिसानी (Police) गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

Advertisement

पीडित तरुणी ही १९ वर्षीय आहे. याप्रकरणी पुणे येथील सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) पीडितेने फर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सांगावी पोलीस ठाण्यात (Sangavi police station) हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींची तरुणीला पिंपळे गुरव येथे बोलावून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

तसेच न्यूड फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर पीडित तरुणी सायंकाळी घरी निघून गेली. आरोपींनी तिला पुन्हा बोलावले. जेव्हा पीडित तरुणीने नकार दिला तेव्हा त्यांनी तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

Advertisement

पीडित तरुणी पुन्हा त्यांच्याकडे गेली. आरोपींनी धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.