पुणे – पुणे शहरातील (pune crime) मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठ (Budhwar Peth) परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. बुधवार पेठ (Budhwar Peth) येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी (pune police) अचानक छापा टाकला असून, तब्बल 18 जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाई नंतर परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. 

यावेळी, पोलिसांनी (pune police) तेथून जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईल, तसेच रोकड असा 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जुगार अड्डयाच्या मालकासह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

बुधवार पेठेतील साई एंटरप्रायझेस दुकानात पणती पाकोळी, सोरट असे जुगाराचे प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकास मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाई केली.

मिळालेल्या माहिती नुसार, जुगार अड्डयाचा मालक अनिल निवृत्ती बांदर्गे (वय 52, रा. रविवार पेठ), वसीम जाफर शेख (वय 32, रा. पाॅप्युलर होम, गणेश पेठ) यांच्यासह जुगार अड्ड्यावरील कामगार तसेच,

जुगार खेळणारे अशा 18 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,

Advertisement

उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, मोहिते, शिंदे, इरफान पठाण, हनुमंत कांबळे आदींनी ही कारवाई केली.

दरम्यान, यापूर्वी देखील पुणे शहरातील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या अश्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी (pune police) अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.

Advertisement