पुणे – पुणे शहरात पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. शहरातील शिवाजीनगर (shivaji nagar) परिसरात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून दहा जणांच्या विरोधात गुन्हा (crime) दाखल केला. या कारवाईमुळे शहरात (Pune) एकच खळबळ उडाली असून, गुन्हेगारांमध्ये (Crime) मोठी दहशद निर्माण झाली आहे. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल संच असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर (shivaji nagar) भागात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून जुगार खेळणाऱ्या दहा जणांना आणि मालकाला ताब्यात घेतले.

मालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, प्रमोद मोहिते, राजेंद्र कुमावत, बाबा करपे, अजय राणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

दरम्यान, या पूर्वीदेखील पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये अचानक छापा टाकत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्याचं पाहायला मिळालं आहे. नागरिकांकडून देखील पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होताना दिसून येत आहे.

बुधवार पेठेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा…

बुधवार पेठ (Budhwar Peth) परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने एका जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला असून, तब्बल 18 जणांना ताब्यात घेतलं होते. या कारवाई नंतर परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

यावेळी, पोलिसांनी (pune police) तेथून जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईल, तसेच रोकड असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जुगार अड्डयाच्या मालकासह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.