पुणे : तुम्ही अनेकवेळा लोकांची तसेच उद्योजक, राजकारणी यांची फसवणूक (Cheating) केल्याचे ऐकले असेल. पण चक्क एका भामट्याने पोलिसांनाच गंडवले आहे. (Pune Police) पोलीस आयुक्त बोलत असल्याचे सांगून फसवले आहे.

मी अहमदाबादचा पोलिस आयुक्त (Commissioner of Police) बोलतोय. तुमच्या शहरात बंदूक विक्रीची मोठी डील (Gun sale deal) होणार आहे.

असे तो पोलीस नियंत्रण कक्षाला (Police control room) सांगत असे. तसेच या आरोपीने पोलिसांनाही पैसे मागितल्याचे समोर आले आहे.

Advertisement

पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchawad) पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. आरोपीला मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. सापळा रचत त्याला पकडण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक युक्ती लढवली. आरोपीने मागितल्याप्रमाणे त्याला पोलिसांनी पैसे पाठवले. त्याचा विश्वास पोलिसांनी मिळवला. त्यामुळे पोलिसांना त्याला पकडणे सोपे झाले.

अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याने याअगोदर पोलिसांची आर्थिक फसवणूक (Financial fraud of the police) ​केल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.

Advertisement