पुणे – गाई, म्हशींच्या दूधवाढीसाठी (milk) त्यांना ऑक्‍सिटोसीन हे औषध (drugs) दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी (pune police) उघडकीस आणला. तसेच ऑक्‍सिटोसीन या औषधांचा साठा करुन तो शहर, जिल्ह्यासह राज्यभरातील गाई, म्हशींच्या मालकांना विक्री करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील टोळीला पोलिसांनी बेड्या (pune crime) ठोकल्या.

पुणे पोलिसांचे (pune police) अंमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलिस ठाणे, अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये तब्बल 53 लाख 52 हजार रुपये किंमतीचा ऑक्‍सिटोसीन औषधांचा साठा जप्त करण्यात आला.

ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी लोहगाव येथील कलवडी वस्ती येथे शनिवारी (दि.5) केली आहे. या कारवाईत पोलिसांनी समीर कुरेशी (रा. उत्तर प्रदेश), बिश्वजित जाना, मंगल गिरी, सत्यजीत मोन्डल, श्रीमंता हल्दर (सर्व रा. पश्चिम बंगाल) यांना अटक केली आहे.

यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा आणखी एक साथीदार त्यांना द्रावण तयार करून देत होता तर समीर कुरेशी हा पुणे आसपासच्या गोठ्यांच्या मालकांना तो बेकायदेशीररित्या (pune crime) पुरवत होता.

त्यांच्याविरुद्ध संगमनत करुन फसवणूक, प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देणे तसेच विविध कलामानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकारी सुहास सावंत यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार पोलिसांनी कलवड वस्ती येथील एका पत्राशेडवर छापा मारला असता पोलिसांनी तेथून पुठ्ठ्याच्या बॉक्स मधून ऑक्सिटोसीन या

द्रावण, मोबाईल, कच्चा माल असा एकूण 53 लाख 52 हजार 520 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. दुध पाणवण्यासाठी हे द्रावण कुपीच्या किंवा इंजेक्शन द्वारे दिले जात होते.

हे औषध गाई किंवा म्हशींना दिल्यानंतर त्यांच्या दुधाद्वारे मानवांना अनेक हानीकारक आजार होतात, जसे की श्रवण कमजोरी, दृष्टी हिनता, पोटाचे आजार, अनैसर्गिक गर्भपात, त्वचेचे आजार असे गंभीर रोग उद्भवतात.

ऑक्सीटक्सीन हे ए प्रकारचे हार्मोन असून त्याचा वापुर हा प्रसूती सुरळीत होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाते, अशी माहिती औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी दिली. यावरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोठे मालकांना ओैषधाची विक्री…

आरोपी समीर कुरेशीने साथीदारांशी संगनमत करुन ऑक्सीटोसीन ओैषधांचा साठा करुन ठेवल्याचे तपासात उघडकीस आले. ऑक्सीटोसीन ओैषध इंजेक्शनमध्ये भरून ते गाई, म्हशींना देण्यात येत असल्याची माहिती आराेपींनी दिली.

आरोपींनी पुणे शहर, जिल्हा तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागातील गोठे मालकांना ऑक्सीटोसीन ओैषधाची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस उपायुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे तसेच एफडीचे सहायक आयुक्त दिनेश खिंवसर, आतिष सरकाळे, सुहास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.