Pune News – पुण्यातील एका उच्च शिक्षित तरुणाने स्वतःची पत्नी कौमार्य चाचणीत अपयशी ठरली म्हणजेच पतीनं पत्नीवर लग्नापूर्वी कौमार्यभंग केल्याचा ठपका ठेवत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे (Pune Crime Diary). याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी फिर्यादीची तक्रार नोंदवून घेत संबंधित विवाहितेच्या उच्च शिक्षित पती व सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना जानेवारी 2021 ते 26 डिसेंबर 2021 दरम्यान अमेरिकेतील टेक्सास, कर्नाटक आणि फुरसुंगीत येथे घडली आहे.

Advertisement

नेमकं प्रकरण काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहिता उच्च शिक्षित आहे. तिचा पतीही उच्च शिक्षित सॉफ्टवेअर अभियंता असून एका नामांकित कंपनीत कार्यरत आहे. अमेरिकेतील टेक्सासयेथे वास्तव्यास आहे. विवाहानंतर पीडित महिला पतीसोबत अमेरिकेला गेली . तिथे गेल्यानंतर पतीनं मधुचंद्राच्या रात्री मिलनानंतर तुला ब्लडींग का झाले नाही, अशी विचारणा केली. एवढ्यावरच न थांबता लग्नाच्या अगोदर तुझे कोणाबरोबरतरी शारीरिक संबंध होते अशी शंका वारंवार घेतली. तुझे लग्ना अगोदर कोणाबरोबर शारीरिक संबंध होते का ? अशी विचारणा करत छळ करण्यास सुरुवात केली. वारंवार विचारणा करून भांडणे काढली. त्यानंतर ते कर्नाटकात परत आले. सध्या ते फुरसुंगी येथे राहात आहेत.

घटस्फोट देण्याची मागणी केली

यामध्ये सासू सासऱ्यांनी पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेता तिचा छळ करण्यास सुरूवात केली. विवाहितेची दुसऱ्या कुठल्यातरी पुरुषासोबत अफेअर म्हणत घटस्फोट देण्याची मागणी केली असल्याची पीडितेने दिली आहे. नवऱ्याने विवाहितेला मारहाण केल्याची तक्रारीत सांगण्यात आले आहेत. सदरीत घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक लाड करत आहेत.

Advertisement