पुणे : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण (Crime Rate) वाढत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींच्या (Minor girls) लैंगिक शोषणाच्या (Sexual abuse) घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पुणे शहरात (Pune City) महिला (Women) सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchawad) येथे एका २१ वर्षीय मुलाने १३ वर्षीय मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीचे आईवडील कामावर गेल्याचे पाहून आरोपीने फायदा घेत तिच्या वर अत्याचार केले आहेत.

याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार (Complaint) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा (Crime) नोंदवत आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात.

Advertisement

आईवडील कामावर गेल्याचे पाहून आरोपी मुलाने याचाच फायदा घेत मुलीच्या घरात घुसला आणि मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी पोक्सो (Pokso) कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक (Arrest) केली आहे.

हा आरोपी डिसेंबर पासून या मुलीवर अत्याचार करत होता. कोणाला सांगू नये म्हणून तो पीडित मुलीला धमकावत असायचा.

Advertisement

मुलीने घडलेला सर्व प्रकार आईवडिलांना सांगितला त्यानुसार मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.