पुणे : शहरात अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या (Rape) घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यात (Pune) रिक्षाचालकाकडून (Rickshaw puller) १० वर्षीय मुलीवर (Minor girl) बलात्कार करण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसर कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) गुन्हा (Crime) नोंद करत 35 वर्षीय रिक्षाचालक आरोपीला अटक केली आहे.

मंगळवारी दुपारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रिक्षाचालक असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही त्याला सोडून गेली आहे.

Advertisement

आरोपीने त्याच्या घराशेजारी राहणारी १० वर्षीय अल्पवयीन मुलीला पत्ते खेळण्याच्या आमिषाने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला.

अल्पवयीन मुलीच्या आईने लगेच आरोपी चे घर गाठत आरोपीला जाब विचारला असता तो पळून गेला. यानंतर पीडित मुलीच्या आईने लगेच कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करत बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Advertisement