पुणे : शहरात आणि जिल्ह्यात बलात्काराच्या (Rape) आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यात एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार (Rape) केल्याने खळबळ उडाली आहे.

पतीसोबत वाढदिवस साजरा (Birthday Celebration) करण्यासाठी पती आणि पत्नी यवत (Yavat) येथील एका हॉटेल (Hotel) मध्ये गेले असताना ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे.

यवत मधील एका हॉटेल मध्ये पतीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी पती आणि पत्नी गेले होते. पीडित महिलेचा पती हॉटेल मध्ये विचारपूस करण्यासाठी गेला असता भावाचा अपघात झाल्याचे पीडित महिलेला सांगण्यात आले.

Advertisement

रस्त्यावर पीडित महिला एकटी उभी असताना आरोपींनी महिलेला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

यवत पोलिसांनी (Yavat Police) २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे. याबाबत महिलेने यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station) तक्रार दिली होती. त्यानुसार यवत पोलिसांनी गुन्हा (Crime) नोंद करत २४ तासांच्या आत ५ आरोपींना अटक केली आहे.

शनिवारी यवतमधील खोर गावामध्ये इनाम टेकडी परिसरात खिंडीची वाडी भागात सडे आठ ते ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement