पुणे : शहरातील कोथरूड (Kothrud) भागात एका टोळक्याने (Mob) अल्पवयीन मुलावर (Mionr Boy) धारदार कोयत्याने (Sharp) वार केल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी तिघांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) गुन्हा दाखल केला आहे.

विशाल ऊर्फ गोटय़ा जाधव, राज जाधव, यश उभे अशी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्र रात्रीच्या वेळी शास्त्रीनगर (Shastrinagar) परिसरातून चाले होते.

Advertisement

रात्री साडेआठ च्या सुमारास अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या मित्राला एका टोळक्याने आडवले. आणि त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

या भांडणाच्यावेळी स्थानिक रहिवासी भांडण सोडवण्यासाठी आले असताना त्यांच्यावरही आरोपींनी कोयता उगारला आहे. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.

या घटनेचा तपास कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी (Sub-Inspector of Police Praveen Kulkarni) करत आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisement