पुणे : शहरात एक धक्कादायक (Shocking) प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील (Pune City) काही मुलींचे फोटो (Photos of girls) नग्न (Naked) अवस्थेत असलेल्या महिलांच्या (Women) चेहऱ्यावर लावण्यात आले आहेत.

शहरातील वस्तीमध्ये राहणाऱ्या काही मुलींचे फोटो (Photo) नग्न महिलांच्या चेहऱ्यावर लावून ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadaki Police) एक तरुणाला अटक केली आहे.

खडकी पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला अटक केली असून न्यायालयाने त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना ९ जानेवारीला पुण्यातील खडकी (Khadaki,Pune) परिसरात घडली आहे.

Advertisement

या २५ वर्षीय आरोपीने काही मुलींचे फोटो मोबाईल मध्ये (Mobile) काढले. हेच फोटो नग्न अवस्थेत असणाऱ्या महिलांच्या फोटोवर लावून ते व्हायरल केले. हा आरोपी तरुण २०१९ पासून असे करत असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी आरोपीने वापर केलेला मोबाईल जप्त केला आहे. त्या मोबाईल मध्ये अजून तपास करणे बाकी आहे. आरोपीने १८ वर्षाखालील ४ मुली आणि ३ महिलांची नवे मिळाली आहेत.

पोलिसांना अजून राहिलेल्या महिला आणि मुलींचा तपास करायचा आहे. आरोपीच्या व्हाॅट्सअपच्या यादीमध्ये ब्राझील, पाकिस्तान यासह अन्य देशातील ग्रुप असून त्यावर अनेक अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल केले आहेत.

Advertisement

त्याबाबत त्याच्याकडे तपास करण्यासाठी, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख (Public Prosecutor Shubhangi Deshmukh) यांनी केली.