पुणे – पुण्यातील (Pune Crime) येरवडा (yerwada) परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरातील जवाननगरमध्ये घडली. पतीने पत्नीचा चाकूने (husband killed wife) वार करून खून केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक सुद्धा केली आहे.

अंकिता अनिल तांबूटकर (45, रा. जय जवाननगर, येरवडा, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अनिल मनोहर तांबूटकर (50) असे आरोपी पतीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल हा अंकिताच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

यामुळे त्यांच्यात भांडणे हाेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भांडणात राग अनावर झाल्याने अनिलने घरातील चाकूने तिच्यावर सपासप वार (husband killed wife) केले. यात ती गंभीर जखमी झाली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

मात्र, आपल्या पत्नीचा खून केल्याने पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उपचार झाल्यानंतर पतीला अटक (Crime) करण्यात आली आहे.

याबाबत येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 1) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जयजवान नगर परिसरातील दुर्गा माता मंदिराजवळ पतीने पत्नीवर शस्त्राने वार केल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अंकिता तांबूटकर घरामध्ये गंभीर जखमी अवस्थेत पडल्या होत्या. चारित्र्याच्या संशयावरून पती अनिलने तिच्यावर चाकूने वार केल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पती अनिलला ताब्यात घेतले आहे.

पत्नीचा खून केल्यानंतर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे अनिलने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

तसेच पत्नीचा खून केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद खटके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

याप्रकरणी पोलिस पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती.