पुणे : शहरातील एका उच्चशिक्षित महिलेला लग्नाचे (Marriage) खोटे आमिष दाखवून फसवण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये (Britain) सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) म्हणून काम करत आहे असे सांगत तिच्याकडून ६२ लाख रुपये लुटण्यात (Rs 62 Lakh Robbery) आले आहेत.

पीडित महिलेची आणि आरोपी तरुणाची ओळख मॅट्रिमोनिअल साईटवर (Matrimonial site) झाली होती. त्यावेळी आरोपी तरुणाने आपण ब्रिटनमध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत आहे असे सांगितले होते.

पीडित महिला पुण्यातील (Pune) एका खासगी कंपनीमध्ये मॅनेजमेंट प्रोफेश्नल (Management Professional) म्हणून काम करते.

Advertisement

फसवणूक (Cheating) झालेल्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) तक्रार दिली आहे.

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पीडित महिला आरोपी तरुणाच्या संपर्कात आली होती. त्यानंतर त्यांनी मोबाईल वरून गप्पा मारायला सुरुवात केली होती.

ब्रिटनमधले काम सोडून आपण कायमस्वरूपी भारतात परतणार असल्याचे आरोपी तरुणाने पीडित महिलेला सांगितले. तसेच भारतात आल्यावर लग्न करू असेही आमिष तरुणाने महिलेला दाखवले.

Advertisement

महिलेनेही आरोपी तरुणाच्या लग्न करण्याच्या म्हणण्याला होकार दिला होता. आरोपी तरुणाने ब्रिटन मधले सगळे सामान भारतात पाठवणार असल्याचे सांगितले होते.

हे सामान भारतात आणण्यासाठी महिलेने सर्व खर्च केला होता. हे सामान भारतात आणण्यासाठी महिलेने १५ वेळा आरोपीच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये ६२ लाख रुपये जमा केले होते.

याचवेळी महिलेला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलीस निरिक्षक संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil) यांनी प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.

Advertisement