पुणे : शहरातील पिंपरी (Pimpari) येथील चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) एक विचित्र घटना घडली आहे. पोलीस महिलेच्या (Police Woman) दुचाकीसह (Two-wheeler) ४ वाहने चक्क पोलीस स्टेशनमध्येच (Police Station) पेटवून (Fire) दिली आहेत.

हा सर्व एका फिरस्त्या तरुणाने केला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

वाहनांना आग लावून त्यांचे नुकसान तसेच सरकारी कामात (Goverment Work) अडथळा आणला आहे म्हणून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

निखिल दत्तात्रय कंगणे (वय २२), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी रेखा गायकवाड यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ३) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिला पोलीस ड्युटीवर जात असताना या तरुणाने त्यांची वाट अडवून त्यांना शिवीगाळ केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. ता तरुण फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

त्यानंतर या तरुणाने चिखली पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये पार्क असलेल्या पोलीस महिलेच्या गाडी सह इतर ४ वाहनांना आग लावून त्यांचे नुकसान केले आहे. तसेच पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेराही तोडले आहेत.

Advertisement

पार्किंगमध्ये असणाऱ्या इतर वाहनांच्या सीटचे कुशन्स फाडले आणि पोलीस ठाण्याच्या काचा दगड मारून फोडल्या आहेत. अशी माहिती चोखली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिली आहे.