पुणे – गांजा विक्रीचा (ganja) आरोप करून तरुणाकडील रोकड आणि मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी (police) पकडले. मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राहुल बाबू रिटे (वय २५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक (crime) करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

तर, दिनेश भागवत पवार (वय ३२, रा. आसाराम बापू आश्रमासमोर, केळगाव, आळंदी) यांनी याबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश शुक्रवारी रात्री मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून जात होते. त्यावेळी आरोपी रिटे आणि त्याच्या साथीदाराने दिनेश यांना अडवले. गांजा (ganja) विक्री करतो का?, अशी विचारणा करून दिनेश यांना धमकावले.

त्यानंतर दिनेश यांच्या खिशातील मोबाईल आणि रोकड असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी हिसकावला. दिनेश यांनी तक्रार देतात पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

त्यानंतर काही तासांतच राहुल अटक (crime) केली तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक वैभव सोपे या गुन्ह्याचा (crime) तपास करीत आहेत.

दरम्यान, सध्या पुणे शहर आणि इतर परिसरात तरुण वर्ग मोठ्या प्राणात गुन्हेगारीच्या दिशेने वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गांजा विक्री, तस्करी आणि धमक्या देणे या प्रकारचे गुन्हे (crime) सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

त्यामुळे स्थानिक पोलिसांनी (police) अश्या तरुणांवर कडक कारवाई करत त्यांना जेरबंद करावे अशी मागणी सध्या सामान्य नागरिकांकडून होत आहे.