पुणे – पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime Rate) प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात (Crime Rate) अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात. नुकतंच शहरातील मार्केट यार्ड (market yard) परिसरात एक मोठी घटना घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.

मार्केट यार्डातील (market yard) एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी गोळीबार करुन २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. गोळीबारामुळे मार्केट यार्ड (market yard) परिसरात घबराट उडाली.

शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ताेंड बांधून चोरटे कार्यालयात शिरले. त्यांनी कुरिअर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत गाेळीबार करून कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटली.

मार्केट यार्ड (market yard) परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. यावेळी चोरट्यांनी अंगडिया यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली.

कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी चोरट्यांनी गोळीबार केला. आणि तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस असे अनेक भाई तयार होत असून, भर चौकात धिंगाणा घालत आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार पाहायला मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कात्रज परिसरातील एका बेकरीत बसलेल्या व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील ८० हजारांची रोकड आणि ३ मोबाइल असा ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना १ नोव्हेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगर परिसरात असलेल्या न्यू मार्शल बेकरीत घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.