पुणे : शहरात गेली काही दिवस गुन्ह्यांच्या प्रमाणात (Crime Rate) वाढ झाली आहे. अशातच पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आयुक्तलयाने (Commissionerate) दिलेल्या माहितीत धक्कादायक (Shocking) आकडेवारी (Statistics) समोर आली आहे.

या घटनांमध्ये अत्याचार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, बलात्कार यासारख्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांकडून (Police) यातील अनेक आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या घटनांमध्ये शिकार ठरलेलयांमध्ये जेष्ठ महिलांपासून अगदी लहान मुलींचाही समावेश आहे.

Advertisement

गतवर्षात १६४ बलात्कारांच्या (Rape) घटनांची नोंद करण्यात आली आहे. आयुक्तलयाने सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याचीही माहिती दिली आहे. ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

ही आकडेवारी समोर आल्यानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्यात महिला (Pune women) सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी पोलीस, विविध सामाजिक संघटना, यांच्याकडून सातत्त्याने उपाययोजना व जनजागृती केली जाते. या घटनांमध्ये बहुतेकदा नात्यातच व्यक्तींनी बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहे.

Advertisement

कोरोना महामारीच्यानंतर पोलीस स्थानकात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हुंड्यांसाठी नका महिलांचा छळ केला जात असल्याचे समोर आले आहे.

इतकाच नाही तर अनेक विवाहितांनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनाही घडली आहे. हुंडाबळीच्या घटनांमध्ये गतवर्षी वाढ झाली आहे.

२०१९ ते २०२१ पर्यंत किती गुन्हे घडले

Advertisement

बलात्कार – २०१९ – १६०, २०२० – १५३, २०२१ – १६४ ,

हुंडाबळी – २०१९– ३०४, २०२० – ३०४ , २०२१- ३०४

देह व्यापार – २०१९ – ४, २०२० -१५, २०२१ – ५९

Advertisement

विनयभंग – २०१९ – ४४०, २०२० – २८४ , २०२१ – ३५१,

आत्महत्या – २०१९ – २६, २०२० – १७ , २०२१ – ४२,

Advertisement