पुणे : तुम्ही आजपर्यंत सुपारी देऊन अनेक खून (Murder) झाल्याचे ऐकले असेल. तसेच कोणालातरी मारायची सुपारी दिली होती असे किस्से ऐकले असतील. पण पुण्यात (Pune) चक्क एका पोलिसानेच पोलिसाला (Police) मारायची (Killing) सुपारी दिली होती.

फरासखाना पोलिस ठाण्यातील (Faraskhana Police Station) कर्मचाऱ्याने दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) एका कर्मचाऱ्याला मारण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोलीस नागरिकांचे रक्षण करण्यासाठी असतात तसेच झालेल्या गुन्ह्याची चौकशी किंवा तपस करण्यासाठी असतात पण पुण्यात पोलिसच एकमेकांचे शत्रू बनल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement

पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील बाळासाहेब लोहार (Sub-Inspector of Police Swapnil Balasaheb Lohar) यांनी तक्रार (Complaint) दिली आहे.

त्यानुसार पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ, योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ३५, रा. एकता कॉलनी, हडपसर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न व कट रचने या कलमानुसार गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

यापैकी अडसुळ याला अटक करण्यात आली आहे. दुधाळ हा फरासखाना पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहे. तर, अडसूळ हा सराईत असून त्याच्यावर खून व इतर असे सहा गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर (Senior Inspector of Police Krishna Indalkar) यांनी दिली आहे.

Advertisement

पोलिसांच्या तपासात पूर्वी झालेल्या वादातून हा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांना या हल्ल्याची अगोदरच माहिती मिळाली होती. त्यामुळे आरोपीने आखलेला कट पोलिसांनी उधळून लावला आहे.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे.

Advertisement