पुणे : शहरात अस्तित्वात नसलेली जमीन (Land) विकण्याचा धक्कादायक (Shocking) प्रकार घडला आहे. एका उद्योजकाला (Entrepreneur) ८५ लाख रुपयाला ही जमीन विकून फसवणूक (Cheating) करण्यात आली आहे.
उद्योजक मिलिंद महाजन यांची २ आरोपींकडून फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) दोघा भावांवर गुन्हा (Crime) दाखल केला आहे. गणेश केंजळे व महेश केंजळे असे आरोपींची नावे आहेत.
उद्योजक मिलिंद महाजन यांनी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार (Police station complaint) दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघा आरोपीना अटक (Arrest) केली आहे.
या दोघांना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने गणेश केंजळे व महेश केंजळे या दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
२०११ मध्ये गणेश व महेश केंजळे या दोघांकडून भोसरी (Bhosari) येथील लघुउद्योजक मिलिंद महाजन यांनी मुळशी तालुक्यातील भुकूम (Bhukum) येथील जमीन खरेदी केली होती. यामध्ये त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
८५ लाख रुपयांमध्ये गट नं. 306 मधील 25 गुंठे जागा विकत घेतली होती. व्यवहार झाल्यानंतर खरेदी खत झाले. आरोपींनी महाजन यांचे १ महिन्यानंतर ही 7/12 वर नाव लावले नाही.
उद्योजक महाजन यांनी आजारपणात जमीन विकण्यास काढली. मात्र, ग्राहकांना महाजन यांच्या नावापुढे जमीनच शिल्लक नसल्याचे दिसून आले. ही जमीन फक्त कागदोपत्री विकून फसवणूक झाल्याचे महाजन यांच्या लक्षात आले.
उद्योजक महाजन यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (Police Inspector Rajkumar Kendra) या प्रकरणाचा तपास करत आहेत.