पुणे : पैशासाठी स्वतःच्या मुलाचे अपहरण (Abduction) करून पनवेलमधील (Panvel) एका जोडप्यासोबत १ लाख (1 lakh) रुपयांचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune) घडला आहे. याप्रकरणी पोलीसांनी (Police) प्रकरणाचा पूर्ण तपास करत यातील गुन्हेगारांना अटक केली आहे.

या मुलाच्या अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्णपणे शोध घेत २४ तासांत या मुलाची सुटका केली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस ठाण्यांमधील ९ तपास पथकांमार्फत चालू होता. हा मुलगा घटनेच्या दिवशी त्याच परिसरात राहणाऱ्या बांगडीवाली भाभीसोबत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बांगडीवाली भाभी जन्नत शेख (रा. जळके वस्ती, कोथरूड) या महिलेला ताब्यात घेऊन तपास करण्यात आला.

Advertisement

त्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासल्यानंतर एक महिला एका मुलास घेऊन जात असल्याने पोलिसांना दिसले. त्यामुळे या महिलेचा पुन्हा सखोल तपास केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला आहे.

धक्कादायक म्हणजे मध्यस्थी व्यक्ती चंद्रभागा माळी व भानुदास माळी यांनी याच मुलाला दुसऱ्या कुटुंबाला १ लाख ६० हजार रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले आहे.

सदर प्रकरणातील गुन्हेगार प्रियंका गणेश पवार, जन्नत बशीर शेख, रेश्मा सुतार, तुकाराम निंबळे, चंद्रकला माळी, भानुदास माळी, दीपक तुकाराम म्हात्रे यांना अटक झाली आहे.

Advertisement