पुणे – पुणे शहर आणि जवळील परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण (Crime Rate) कमी होताना दिसत नाही. मात्र, दिवसागणित पुण्यात (Pune Crime) आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारीचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. अशातच पुणे शहरात (Pune Crime) एक धक्कादाय घटना घडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यातील कात्रज (Katraj) परिसरातील एका बेकरीत बसलेल्या व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील ८० हजारांची रोकड आणि ३ मोबाइल असा ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना १ नोव्हेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगर परिसरात असलेल्या न्यू मार्शल बेकरीत घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मात्र, जहिरुद्दीन अन्सारी (४९, रा. कोंढवा, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी यांची संतोषनगर परिसरात बेकरी आहे.

१ नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास ते दुकानात बसले होते. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी अन्सारी यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटले.

यावेळी त्यांच्याकडील तब्बल ८० हजारांची रोकड आणि ३ मोबाइल असा ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. सध्या पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

तरुणाला तलवारीने हल्ला करून लुटले…

दरम्यान, काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात रस्त्याने चाललेल्या तरुणावर चार जणांनी तलवारीने हल्ला (Crime) करत त्याला लुटल्याचा प्रकार घडला होता. थरमॅक्स चौकात ही घटना घडली आहे.

रात्री साडेअकराच्या सुमारास थरमॅक्स चौकात हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादीच्या हातावर तलवार मारून फिर्यादीच्या खिशातील पाकिटातील एक हजार रुपये, १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल, तसेच दोन हजार रुपये किमतीची बॅग हिसकावून पळ काढला होता.

सध्या शहरातील गुन्हेगारीचे प्रमाणात मोठ्या संख्येने वाढले असून, लवकरच या गुन्हेगारीला आलं बसावा अशी भावना सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.