पुणे – बाल लैंगिक अत्याचारासबंधी तपासासाठी आलेल्या महिला सहाय्यक पोलीस (pune police) निरीक्षक एसीबी च्या जाळ्यात अकडल्या आहेत. त्यांना 2 लाखांची लाच घेताना एसीबी ने रंगेहाथ पकडले, याबाबत जेष्ठ महिला डॉक्टरने पुण्याच्या (pune) एसीबीकडे तक्रार केली होती. नलीनी शंकर शिंदे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) (Nalini Shankar Shinde) नेमणूक महिला अत्याचार निवारण कक्ष सिंधुदुर्ग अस लाचखोर महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

नलीनी (Nalini Shankar Shinde) या मालवण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्याच्या तपासाठी निगडीत आल्या होत्या.

त्यांनी जेष्ठ महिला डॉक्टरकडे सोनोग्राफी सेंटर (Sonography Center) सील न करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करते असे म्हणून 5 लाखांची लाच मागितली,

तडजोडअंती 2 लाख घ्यायचे ठरले, ते पैसे घेताना एसीबी ने पोलीस अधिकारी नलीनी यांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),

अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

तसेच, सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले.