पुणे : शहरात (Pune City) गुन्हेगारीचे (Crime Rate) प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस (Police) चांगलेच सतर्क झाले आहे.

पुण्यात विनापरवाना पिस्तूल (Unlicensed pistol) बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक अटक करण्यात आली आहे.

सिंहगड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Police Station) हद्दीत ही कारवाई (Action) करण्यात आली आहे. पोलिसांनी तरुणाकडून १ पिस्तूल (Pistul ) आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

Advertisement

प्रशांत उर्फ बाळा सुरेश कांबळे (Bala Suresh Kamble) (वय २४ रा. आनंदनगर, चिचंवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी (Police officer Ujwal Mokashi) व शंकर कुंभार (Police officer Shankar Kumbhar) हे सिहंगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, नवले पुलाजवळ (Navale bridges) एक व्यक्ती पिस्तूल घेऊन थांबला आहे.

पोलिसांनी त्या ठिकाणी जात संशयित तरुणाची (Suspicious youth) चौकशी (Inquiry) करत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.

Advertisement

पोलिसांनी त्याच्याकडून सहाशे रुपये किमतीचे २ जिवंत काडतूस आणि ४० हजार किमतीचा पिस्तूल असा मुद्देमाल जप्त केला आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

त्याच्यावर खुनाचे आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याचे अगोदरच गुन्हे पिंपरी चिंचवड येथे दाखल आहेत.

Advertisement