पुणे : जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) वाढत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र अशा सर्व परिस्थिती मध्ये पुणे महानगर पालिकेचे (Pune Muncipal Corporation) महापौर (Mayor) गुजरात दौऱ्यावर चालले आहेत.

पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) , मनपा आयुक्त, मनपा अतिरिक्त आयुक्त हे सर्वजण महापालिकेतील महत्वाच्या प्रकल्पाच्या अभ्यास दौऱ्यासाठी गुजरातला जाणार आहेत.

एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच महापौर गुजरात (Gujrat) दौऱ्यावर चालल्यामुळे विरोधकांनी सडकून टीका केली आहे.

Advertisement

महापौरांचा हा दौरा रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कोरोना परिस्थिती महापौर यांनी शहरात थांबणे आवश्यक आहे.

या परिस्थिती त्यांनी गुजरात दौरा करणे उचित नाही. तसेच महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी बंद करावी. महापौरानीं गुजरात दौरा रद्द करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे (Dr. Abhijit More) यांनी केली आहे.

विरोधकांनी केलेल्या टीकेला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले आहे. गुजरातचा दौरा परदेशात नाही. त्यामुळे कोरोना आणि दौरा हे दोन वेगळे विषय आहेत.

Advertisement

पालिका हद्दीत उभे राहणाऱ्या दोन महत्वाच्या प्रकल्पा संदर्भात हा गुजरातचा अभ्यास दौरा असल्याचे सांगत महापौर मुरलीधर मोहळ दौऱ्याचे समर्थन केले आहे.