पुणे : जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणूक (Pune District Central Co Operative Bank Election) लागल्या आहेत.

यातच आता बिनविरोध निवडून येण्याचे सत्र सुरु झाले आहे. काल दौंडचे राष्ट्रवादी काँग्रेचे (NCP) रमेश थोरात (Ramesh Thorat) बिनविरोध निवडून आले आहेत.

तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya Bharane) हे देखील पुणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत ‘ब’ वर्गातून बिनविरोध निवडून आले आहे.

Advertisement

विरोधी उमेदवारांनी वेळीच अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप, आमदार दिलीप मोहिते पाटील हेदेखील आधीच बिनविरोध (Unopposed) झाले आहेत.

मंगळवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कालपर्यंत 123 उमेदवारांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

Advertisement

तर सात जागांसाठी आता 14 उमेदवार (Candidate) निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची पुणे जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता आहे. ही बँक सहकार क्षेत्रातील (Cooperative sector) अग्रगण्य बॅंक आहे.

अजित पवार यांची राजकारणाला सुरुवात याच बँकेपासून झाली आहे. ते सात वेळा बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत.

Advertisement