पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Co Operative Bank Election) निवडणुकीचा निकाल (Election Result) आज लागणार आहे. या अगोदर २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर ७ जागांचा निकाल आज लागणार आहे.

सहकार (Cooperation) क्षेत्रातील महत्वपूर्ण आणि अग्रगण्य बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकहाती सत्तेसाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

या निवडणुकीत बँक पतसंस्थांसाठीच्या ‘क’ गट आणि हवेली मुळशी तालुक्यातील ‘अ’ वर्ग सोसायटी गटातील निकालाबद्दल मोठी उत्सुकता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना (NCP) आणि अजित पवार यांना लागली आहे.

Advertisement

निवडणुकीची मतमोजणी अल्पबचत भवन येथे होणार आहे. गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा बँकेची एकहाती सत्ता होती. २१ पैकी २१ जागा अजितदादा पवार यांच्याकडे होत्या.

यावेळीही अजित पवार यांची २१ जागांसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या वर्षीच्या बँक निवडणुकीत अजित पवार यांच्या किती जागा निवडून येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. पवार यांनी ७ वेळा बँकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

Advertisement

यावर्षीच्या २१ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. अजित पवार यांची जागा बिनविरोध झाली आहे.

तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आंबेगाव तालुक्यातील ‘अ’ वर्ग गटातून बिनविरोध आले आहेत. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne), इंदापूर “अ” वर्ग गटातून बिनविरोध झाले आहेत.

Advertisement