File Photo

पुणे : जिल्हा बँकेच्या निवडणूका जाहीर (Pune District Bank Election) झाल्या आहेत. यातील काही उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर काही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सहकार पॅनेलच्या (Cooperation panel) प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात अजितदादा पवार (Ajitdada Pawar) बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळात (Pune District Central Co-operative Bank Board of Directors) मी जाणार नव्हतो.

परंतु, मी संचालक मंडळात नसलो तर ‘दादा’ गडबड होईल, अशी शक्‍यता अनेकांनी वर्तविली होती. यासाठी अनेकांनी माझ्याकडे आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे आग्रह धरला होता.

Advertisement

त्यामुळेच अर्ज भरला आहे. यांना बॅंकेचा मोह सुटत नाही का? असा विचार करू नका. खरे तर आम्हा दोघांनाही बॅंकेची निवडणूक (Bank Election) लढवण्याची इच्छा नव्हती अशी भावना अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश (Entering politics) करतानाच किस्सा ही सांगितला आहे. त्यांनी त्यांच्या राजकारणाच्या कारकिर्दीला सुरुवात कशी केली त्याची आठवणही केउन दिली आहे.

अजित पवार म्हणाले, 1991 मध्ये स्वर्गीय सुभाषअण्णा कुल व रमेश थोरात यांनी सांगितले की, तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणात यायचे असेल तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी ‘अ’ वर्गातून निवडणूक लढवा.

Advertisement

त्यावेळी बारामतीतील (Baramati) जागा कधी आपल्या विचारात येत नव्हती, तिथे आपले सहकारी काकडे परिवाराचे वर्चस्व होते. त्यामुळे तिथे निवडणूक लढवायला नाखूष असायचे.

पण, या दोघांचे म्हणणे मी ऐकले. त्यावेळी धाडस दाखवले. लोकांना वैयक्तिक भेटलो. लोकांनी मला निवडणूक दिले अन मी बॅंकेत गेलो. त्यावेळी बॅंकेच्या ठेवी होत्या 391 कोटी रुपये.

आज या गोष्टीला 30 वर्ष झाली. बॅंकेच्या ठेवी आता 11 हजार कोटींच्या पुढे गेलेल्या आहेत. असेही अजित पवार यांनी बोलताना सांगितले आहे.

Advertisement