पुणे – दिवाळी (Diwali) सणानिमित्त मुलांसह तरुण मंडळींना खाद्यपदार्थ, नवीन कपडे, वस्तू इत्यादींच्या खरेदीबरोबरच फटाके वाजवण्याचेही भलतेच आकर्षण असते. त्यामुळे दिवाळीनिमित्त फटाका मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिव्यांचा, प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असलेली दिवाळी (Pune Diwali) नुकतीच सुरू झाली असून, सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अश्यातच, दिवाळी सणानिमित्त (Pune Diwali) पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ नुसार पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात

24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते 23 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणारे फटाके उडवण्यास रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण मनाई केली आहे.

या कालावधीत 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या आणि 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे सर्व साखळी फटाके उडवण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे.

कोणत्याही रस्त्यावर किंवा रस्त्यापासून 50 फुटांच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडवणे किंवा दारूकाम सोडणे किंवा फेकणे अगर आगी फुगे (फायर बलून) किंवा अग्निबाण सोडणे, उडवणे असे कृत्य करणे,

एखादा फटाका उडवण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन विक्री व वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.

साखळी फटाके 50 ते 100 तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडवण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 110, 115 व 125 डेसिबलपेक्षा जास्त असता कामा नये.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम १३१ प्रमाणे कायदेशीर शिक्षेस पात्र राहील. असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे दिवाळीत या नियमांचे पालन करून सर्वांनी आपला आनंद साजरा करावा असं सांगितलं आहे.

फटाके विक्रीसाठी काय आहेत नियम वाचा…

1) कागदी स्फोटक पदार्थ ठेवलेले व त्याभोवती 42.534 ग्रॅम वजनाचा 5.715 सेमी लांबीचा 3.175 सेमी व्यासाचा दोरीने गुंडाळलेला अॅटम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादनावर जवळ बाळगणा-यावर आणि विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

2) सणांच्या वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध आहेत.

3) एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणा या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.