पुणे – राज्यातील ओबीसी (OBC) आरक्षणाचा प्रश्‍न सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका (Election) पुढे ढकलण्याचा कायदा विधीमंडळाने मंजूर केला. विशेष म्हणजे राज्यपालांनीही या कायद्यावर सही केल्याने कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे, राज्यातील (maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (supreme court) गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) निवडणूक तारखांचा खेळ अखेर थांबवला असून,

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा असे थेट आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे महापालिका निवडणुकांचा (corporation) मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

आणि याच आदेशाचे पालन करून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून 2017 च्या तुलनेत 2022 च्या निवडणूकीसाठी

तब्बल 8 लाख 23 हजार 916 मतदार पुणे महापालिका निवडणुकीसाठी (pune election update) वाढल्याचे स्पष्ट झाले असून, या यादीवर तब्बल 4 हजार 273 हरकती आल्या आहेत.

त्यामुळे त्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागणार आहे. आणि म्ह्णूनच 9 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी तयार करणे कठीण आहे.

Advertisement

त्यामुळे महापालिकेने (pune election update) ही मुदत 23 जुलैपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे (Election commission) करण्यात आली आहे.

प्रारूप यादीवर हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 1 हजार 747 हरकती नोंदविण्यात आल्या. यासह एकूण हरकतींची संख्या 4 हजार 273 इतकी आहे. तर राजकीय पक्षांकडून 562 हरकती आलेल्या आहेत.

दरम्यान, ही मतदार यादी तयार करत असताना मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. बहुतांश सर्व प्रभागातील अनेक मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. त्यामुळे आपले मतदार दुसरीकडे गेल्याने इच्छुकांमध्येही घालमेल आहे.

Advertisement