पुणे – राज्यातील ओबीसी (OBC) आरक्षणाचा प्रश्‍न सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका (Election) पुढे ढकलण्याचा कायदा विधीमंडळाने मंजूर केला. विशेष म्हणजे राज्यपालांनीही या कायद्यावर सही केल्याने कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे, राज्यातील (maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (supreme court) गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) निवडणूक तारखांचा खेळ अखेर थांबवला असून,

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा असे थेट आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे महापालिका निवडणुकांचा (corporation) मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीनुसार पुणे शहरातील सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणूक (corporation) शाखेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी नुकतीच जाहीर केली आहे.

तसेच, प्रारूप मतदार यादीतून 2017 च्या तुलनेत 2022च्या निवडणूकीसाठी तब्बल 8 लाख 23 हजार 916 मतदार पुणे महापालिका निवडणुकीसाठी (pune election update) वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीसाठी (pune election update) 58 प्रभाग असून 173 नगरसेवक निवडून येणार आहेत. यामध्ये सहा मतदार संघात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

गोखलेनगर-वडारवाडी (प्रभाग क्रमांक-15), फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणा (प्रभाग क्रमांक 16), शनिवार पेठ-नवी पेठ (प्रभाग क्रमांक 17), शनिवारवाडा-कसबा पेठ (प्रभाग क्रमांक 18),

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ (प्रभाग क्रमांक 19) आणि घोरपडे पेठ उद्यान-महात्मा फुले मंडई (प्रभाग क्रमांक 29) या सहा प्रभागात महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत.

विशेष म्हणजे हे सर्व प्रभाग शहराच्या मध्यवर्ती भागातील आहेत. तर, धक्कादायक बाब म्हणजे सर्वात जास्त मतदार प्रभाग क्रमांक 54 यामध्ये 1 लाख 3 हजार 959 मतदार आहेत.