पुणे – ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरा, नऱ्हे आणि धायरी येथील बहुतांश भागात विजेचा (electricity) लपंडाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सगळीकडे दिवाळीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. आणि अश्यातच शहरातील काही भागांमध्ये लाईट (electricity) नसल्याने महिला भगिनी व व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनी आपल्या ग्राहकांना दिवाळी नीट खाऊ देणार की नाही, असा प्रश्न उपथित होत केला जात आहे.

शहरातील (Pune) स्थानिक नागरिक आपल्या कुटुंबांसह दिवाळी साजरी करत आहे. महिलावर्ग देखील दिवाळीचे पदार्थ करण्यात व्यस्त असताना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विजेचा (electricity) लपंडाव सुरू झाला आहे.

विजेची ये-जा सुरू असल्यामुळे शहरातील नळ पाणीपुरवठा ठप्प होत आहे. गिरण्याही दिवाळीत बंद ठेवाव्या लागत आहेत. विजेच्या लपंडावामुळे पथदिवे बंद पडत असल्यामुळे रस्ते सुद्धा रात्रीच्या अंधारात लुप्त होऊन जात आहे. आणि याचा सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे – धायरी येथील बहुतांश भागात गुरुवारी दिवसभर बत्ती गुल होती. तर शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून वीज पुरवठा बंदच होता, आजही वारंवार वीज पुरवठा बंद पडत आहे.

या परिसरात वारंवार विजेचा अनियमित पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

वर्क फ्रॉम होम, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. वारंवार होणाऱ्या विजेच्या या खेळखंडोबामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत.

दिवाळी सणाची तयारी सगळीकडे सुरू असताना अशा स्थितीत गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रकार झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त झाला.

या भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. काहींनी ‘महावितरण’च्या कार्यालयाला फोन केल्यावर कधी रेंज नाही तर कधी फोन लागत नाही, अशी स्थिती होती.