पुणे : नवीन वर्षाचे (New Year) स्वागत करण्यासाठी लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. याच नव वर्षाच्या पार्शवभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) नजर ठेवण्यासाठी पुणे शहरात (Pune City) पथके दाखल केली आहेत.

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात बेकायदा (Illegal) किंवा भेसळयुक्त (Adulterated) मद्यविक्री (Alcohol sales) होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच पथकांची नियुक्ती केली आहे.

नवीन इंग्रजी वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पर्यटन स्थळी जातात तर काहीजण पार्ट्यांचे आयोजन करतात. या पार्ट्यांमध्ये सर्रास पणे विनापरवाना दारू (Unlicensed alcohol) खरेदी केली जाते.

Advertisement

खासगी ठिकाणी पार्टीत दारू आणली जाते. या पार्ट्यांचे आयोजन कारण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असते. या पार्टीत पुरविण्यात येणारे मद्य कोठून आणण्यात आले आहे, त्या मद्याचा दर्जा याबाबत तपासणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथके नियुतक केली आहेत.

ही पथके संशयित ठिकाणी छापे टाकणार आहेत. तेथील दारूचा दर्जा आणि ती दारू कोठून खरेदी केली आहे व त्या दारूचा खरेदी परवाना आहे का नाही हे या पथकांकडून तपासले जाणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे (State Excise Pune Division Superintendent Santosh Jhagde) म्हणाले, उपधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या या पथकांमध्ये प्रत्येकी पाच निरीक्षक आणि जवान आहेत.

Advertisement

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी ही पथके असून, त्यांच्याकडून उपाहारगृहे आणि विविध ठिकाणांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर दोन भरारी पथके देखील असणार आहेत.

या पथकांकडून विविध ठिकाणी छापे टाकले जाणार आहेत. दरम्यान, कोरोना आणि ओमिक्रॉन रुग्णांच्या (omicron Patients) संख्येत वाढ होत असल्याने रात्री नऊनंतर जमावबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे.

त्यामुळे उपाहारगृहे आणि बिअरबारमध्ये (Beer bar) ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. नवर्षाच्या स्वागत पार्टीमध्ये दारू खरेदी करणाऱ्यांचे तसेच पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते.

Advertisement

यासाठी परवाने (Licenses) घेणे आवश्यक असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यपान परवाने देण्यात येतात. ज्यांना मद्यखरेदी किंवा विक्री करायची आहे त्यांना हे परवाने घेणे आवश्यक आहे.