पुणे – महायुद्धात सैनिकांनी (soldiers) वापरलेल्या दुर्बिणी, त्यांचे मेडल्स, टोप्या आणि पोषाख तसेच एक मिली ग्रॅमच्या सोन्याच्या गणपतीची रूपे अशा वैविध्यपूर्ण वस्तूंचा खजिना पुणेकरांसाठी काल पासून खुला झाला आहे. इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमसतर्फे बालगंधर्व कलादालनात (Balgandharva Rangmandir) आयोजित दुर्मिळ वस्तूंच्या प्रदर्शनाचे (exhibition) शुक्रवारी चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते नुकतंच उद्‍घाटन झाले.

या प्रदर्शनामध्ये बॉटल ओपनर, वेगवेगळे लाकूड आणि धातूंपासून बनविलेल्या आजोबांच्या काठ्या, शंख शिंपले, कोरल्स अशा दुर्मिळ वस्तूं या प्रदर्शनामध्ये पाहण्यास मिळत आहे. रसिकांसाठी खुला झाला आहे.

या दुर्मिळ वस्तूच्या प्रदर्शनात चंद्रकांत पुराणिक यांचा आजोबांच्या काठ्याच स्टॉल आहे. त्याबाबत ते म्हणाले की, मी अनेक वर्षापासून काठ्याचा संग्रह करीत आहे. माझ्याकडे देश विदेशातील तब्बल १२० काठ्या आहेत.

त्यामध्ये काही काठय़ांना चांदीची मूठ आहे. तर त्यामध्ये इजिप्तमधील एक काठी आहे. त्यावर विविध प्राण्याची डिझाईन काढण्यात आलेली आहे.

तसेच मी जिथे कुठे जाईल तिथे वेगळी काठी दिसली की, खरेदी करत असतो आणि मला काठयांचा संग्रह करण्यास खूप आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील बालगंधर्व कलादालनात (Balgandharva Rangmandir) आयोजित हे प्रदर्शन रविवार दहा ते सायंकाळी सात या वेळेत रसिकांसाठी खुले राहणार आहे.

या कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी अभिनेत्री, कवयित्री आणि निर्मात्या भाग्यश्री देसाई, प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक शशिकांत ढोणे, श्याम मोटे, सचिव शरद बोरा, खजिनदार नितीन मेहता आदी उपस्थित होते.

इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस या संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनात पुण्यासह राज्याच्या विविध भागातील संग्राहकांनी त्यांच्याकडील दुर्मिळ वस्तू मांडल्या आहेत.

भारताने जिंकलेला क्रिकेट विश्वचषक अशा महत्त्वपूर्ण घटनांची साक्ष देणारी ५० ते १०० वर्षांपूर्वीची जुनी वृत्तपत्रे, दिग्गजांच्या स्वाक्षरीवरून मधुसुदन घाणेकर यांनी केलेला त्यांच्या स्वभाव विश्लेषणाचा संग्रह,

तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिवंगत नामवंतांच्या स्वाक्षऱ्यांचा गजानन पटवर्धन यांनी केलेला संग्रह सुद्धा यावेळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे.