9.8 C
New York
Sunday, November 3, 2024

Buy now

spot_img

पुणे : कात्रज चौकात भीषण अपघात; कंटेनर अन मोटरसायकलची जोरदार धडक, पोटावरून कंटेनरचे चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

Pune News : अलीकडे रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत आहेत.

रस्ते अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पुण्यातही गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीच्या कारणांनी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

यामुळे शहरात प्रवास करताना नागरिकांमध्ये मोठी भीती आहे. अशीच एक अपघाताची घटना आज पुण्यातील कात्रज चौकात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कात्रज चौकात 12 चाकी कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या घटनेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आज 17 मेला सकाळी नऊ वाजता कात्रज बायपासकडून देहूरोडला जाताना हा अपघात घडला आहे. या अपघातात सोलापूर येथील रहिवासी दुचाकीस्वार संतोष दिलीप तिखट हे कंटेनरच्या जागा खाली सापडलेत आणि त्यांचा मृत्यू झाला.

संतोष हे कंटेनरच्या पुढच्या भागातील डाव्या चाकाखाली सापडलेत, यामुळे ते खाली कोसळले. या घटनेची माहिती भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस हवालदार यांनी वॉर्डनच्या मदतीने संतोष यांना बाजूला काढले. दरम्यान, जखमी संतोष यांना रुग्णालयात घेऊन जात असतांना त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारती विद्यापीठ पोलिसांनी मयत संतोष यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवला. दरम्यान, ज्या कंटेनरने धडक दिली होती त्याचे चालक विठ्ठल बाबासाहेब गीते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कंटेनर चालक हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील मसोबावाडी या गावातील रहिवासी आहे. या कंटेनरच्या चालकाला आता ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांच्या माध्यमातून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.

चालकाला ट्राफिक पोलिसांनी पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांच्या माध्यमातून आता या प्रकरणाचा पुढील तपास पूर्ण केला जाणार आहे.

ताज्या बातम्या