पुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागवली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

मात्र, अश्यातच शहरात काही ठिकाणी गंभीर घटना देखील घडल्याचं पाहायला मिळालं. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल 17 ठिकाणी आगीच्या (Pune Fire News) घटना घडल्या आहेत.

सायंकाळी सहानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. एकापाठोपाठ एक आग लागल्याच्या घटना (Pune Fire News) उघडकीस आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची ही चांगली तारांबळ उडाली होती.

सायंकाळी सात नंतर या सर्व घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुणालाही गंभीर जखम अथवा जीवितहानी झाली नाही.

पुण्यातील ‘या’ ठिकाणी घडल्या आगीच्या घटना….

1) वेळ 07.55 – जनता वसाहत, गल्ली क्रमांक 47 येथे झाडाला आग

2) वेळ 08.23 – काञज, आंबेगाव पठार, साईसिद्धि चौक गॅलरीमधे आग

3) वेळ 08.30 – बी टी कवडे रस्ता, बीटाटेल इनक्लेव्ह येथे सोसायटीत आग ( 7 दुचाकी पेटल्या)

4) वेळ 08.44 – नरहे, मानाजी नगर, ज्ञानदेव शाळेच्या छतावर आग

5) वेळ 08.48 – विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटलजवळ झाडाला आग

6) वेळ 08.51 – वारजे माळवाडी, चैतन्य चौक, युनिवर्सल सोसायटीत बंद घरामधे आग

7) वेळ 09.16 – सिहंगड रस्ता, शारदा मठाजवळ, श्वेता सोसायटीत नारळाच्या झाडाला आग

8) वेळ 09.40 – गुरुवार पेठ, शितळादेवी चौक जुन्या वाड्यामधे आग

9) वेळ 09.46 – लोहगाव, अंबानगरी, लटेरिया सोसायटीत आग

10) वेळ 09.55 – वडगाव शेरी, टेम्पो चौक झाडाला आग

11) वेळ 10.03 – खडक पोलिस स्टेशन, लाकडी गणपती जवळ गॅलरीमधे आग

12) वेळ 10.29 – औंध, डीपी रस्ता, इंडियन बँकेजवळ, टेरेजा सोसायटी घरामधे आग

13) वेळ 10.31 – सिंहगड रस्ता, संतोष हॉलमागे नारळाच्या झाडाला आग

14) वेळ 10.42 – बालेवाडी, दत्तमंदिरा जवळ एका दुकानामधून धूर

15) वेळ 10.44 – शनिवार पेठ, नाना-नानी पार्क येथे कचऱ्याला आग

16) वेळ 11.44 – भांडारकर इन्स्टीट्यूट जवळ बुलेट गाडीला आग

17) वेळ 11.55 – बुधवार पेठ, तपकीर गल्ली दुकानामधे आग