पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे शहर (Pune) आणि परिसरात आगीच्या (Fire News) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल पुन्हा एकदा शहारत आगीची (Fire News) घटना आहे. पुणे शहरात (Pune) नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्यातच, पुन्हा एकदा शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या कोथरूड (Kothrud) येथील आशिष गार्डनजवळील श्रावणधारा सोसायटीच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.

इमारत चौदा मजल्यांची असून दुसरा मजल्यावरुन आग (Fire News) वरवरती पेट घेत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून ०५ फायरगाड्या व ०१ वॉटर टँकर रवाना झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणधारा हाउसिंग सोसायटी ही चौदा मजली इमारत (Kothrud) असुन दुसरा मजल्याला आग लागली आहे. दुसरा मजल्यापासुन एक एक मजला वरती पेट घेत असुन,

घरगुती विद्युत वायर मुळे हि आग भडकत असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी सांगत आहे. तळमजल्या पासुन शेवटच्या मजल्यापर्यंत शाँर्ट सर्कीट झाले आहे.

दरम्यान, इमारतीमधील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले असुन नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाकडून ही भीषण आग वीजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पुण्यात एकाच वेळी लागली तीन ठिकाणी आग….

पहिली आग ही नेहरू रस्त्यावरील अप्सरा चित्रपटगृहाजवळ लागली होती. सायंकाळी याठिकाणी नाल्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

तर दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या रविवार पेठेतील तांबोळी मशिदीजवळ तारा माॅल येथे आग लागल्याची घटना घडली आहे.

रविवार पेठेतील तारा माॅल येथे सात मजली इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. छतावर ठेवलेल्या रिकाम्या प्लास्टिक टाकीला आग लागल्याचे जवानांच्या निदर्शनास आले.

तर तिसरी आग पुण्यातील हडपसर भागातील चिंतामणी नगर परिसरात एका गादी कारखान्यात आग लागली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे आणि जवानांनी आग आटोक्यात आणली.