पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे शहर (Pune) आणि परिसरात आगीच्या (Fire News) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल पुन्हा एकदा शहारत आगीची (Fire News) घटना आहे. पुणे शहरात (Pune) नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील वानवडी गावठाणातील शिवरकर चाळीमध्ये भीषण आग (Fire News) लागली असून, यामध्ये चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत.

यावेळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्याच्या मदतीने साधारण एक तासांत आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून झोपड्या मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण साडेअकरा वाजता या परिसरात मांडवाचे सामान ठेवलेल्या खोलीमध्ये शॉर्टसर्किट झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या खोलीत ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन आगीने भडका घेतला.

त्यामुळे आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली, रात्रीची वेळ असल्याने सर्व नागरिक झोपलेले होते, अचानक धूर आणि अग्नीच्या उष्णतेने नागरिकांना जाग आली.

घरातील सिलेंडर घेऊन काही नागरिक आगीच्या ठिकाणापासून दूर पळत सुटले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्व सामान, कपडे, इतर साहित्य जळून खाक झाले आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून वडगावशेरी परिसरात भीषण आग (Fire News) लागली होती. वडगावशेरी येथील सोपान नगर येथे एका गोडाउनला ही आग (Fire News) लागली होती.

अग्निशमनदलाच्या जवानांकडून बराच वेळ आग विझवण्याचं काम सुरु होतं. यावेळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर ही भीषण आग आटोक्यात आली होती.

पुणे शहरात आणि परिसरात सध्या आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. साधारण दिवाळी पासून या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.